Ganpati Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर; मध्य रेल्वेच्या 262 विशेष गाड्या; ‘असं’ असेल वेळापत्रक

यंदाच्या उत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने एकूण 262 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली असून त्यापैकी 200 आरक्षित गाड्यांमध्ये 1,17,682 प्रवाशांनी आपले आरक्षण पूर्ण केले आहे.

Ganpati Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर; मध्य रेल्वेच्या 262 विशेष गाड्या; ‘असं’ असेल वेळापत्रक

Ganpati Special Trains: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोहीम स्तरावर तयारी सुरू केली आहे. यंदाच्या उत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने एकूण 262 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली असून त्यापैकी 200 आरक्षित गाड्यांमध्ये 1,17,682 प्रवाशांनी आपले आरक्षण पूर्ण केले आहे. 9 सप्टेंबरपासून या विशेष गाड्या मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांतून कोकणातील विविध ठिकाणांसाठी धावतील. 

गणेशोत्सव 14 सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी जातात. प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि नियमित गाड्यांमधील फुल्ल बुकिंग लक्षात घेता रेल्वेने आरक्षित गाड्यांसोबत 62 अनारक्षित विशेष गाड्यांचीही सोय केली आहे.

सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक सेवा; स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी विशेष आराखडा

एकूण विशेष फेऱ्यांपैकी सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक 112 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय रत्नागिरीसाठी 64, तर मडगावसाठी 24 विशेष फेऱ्या धावतील. या गाड्यांमध्ये वातानुकूलित (AC), स्लीपर आणि सामान्य डब्यांचा समावेश असेल. स्थानकांवरील वाढती गर्दी सुरळीत हाताळण्यासाठी मध्य रेल्वेने अतिरिक्त तिकीट खिडक्या, रांग व्यवस्थापन आणि प्रतीक्षा कक्षांची निर्मिती केली आहे. तसेच सुरक्षेसाठी आरपीएफ (RPF) जवान आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त ताफा तैनात करण्यात येणार असून प्रवाशांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अन्न-पाण्याची व्यवस्था केली जाईल.

हेही वाचा – Ganeshotsav 2026 : आता होऊ दे कल्ला! गणेशोत्सवात 'या' चार दिवशी रात्री 12 पर्यंत वाजणार डीजे-स्पीकर; जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

प्रवाशांना 30 मिनिटे आधी पोहोचण्याचे आवाहन 

ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या किमान अर्धा तास आधी स्थानकावर पोहोचावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग आणि थांब्यांची माहिती 'NTES' ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, अनारक्षित तिकिटांच्या बुकिंगसाठी रेल्वेच्या नव्या एकात्मिक 'RailOne' ॲपचा वापर करण्याचे सुचवण्यात आले आहे. रेल्वेच्या या पूर्वतयारीमुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर आणि आरामदायी होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number