konkan Railway : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी एक्स्प्रेस! कसे असतील थांबे अन् वेळ?, वाचा सविस्तर वेळापत्रक

रेल्वे स्थानक आणि एसटीमध्ये होणाऱ्या गर्दीचा विचार करता प्रवाशांचा प्रवास हा अधिक सोयीचा होण्यासाी रेल्वे प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आलेले आहे.

konkan Railway : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी एक्स्प्रेस! कसे असतील थांबे अन् वेळ?, वाचा सविस्तर वेळापत्रक

ठाणे :  गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे मुंबई सहउपनगरातील प्रवाशांची कोकणात जाण्याची लगबग ही वाढू लागली आहे. रेल्वे स्थानक आणि एसटीमध्ये होणाऱ्या गर्दीचा विचार करता प्रवाशांचा प्रवास हा अधिक सोयीचा होण्यासाी रेल्वे प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आलेले आहे. याच निमित्ताने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट
मध्य रेल्वेने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या असंख्य प्रवाशांसाठी एक नवी दैनंदिन एक्सप्रेस सुरु केली आहे. जी मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी या दरम्यान धावते. मात्र, या विशेष गाडीचे वेळापत्रक काय आहे शिवाय ही एक्सप्रेस कोण-कोणत्या स्थानकांवर थांबेल, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

हेही वाचा-Mumbai Monorail Update: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! एका वर्षानंतर पुन्हा धावणार मोनोरेल, पण दिवाळीपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानिमित्ताने ही एक्सप्रेस आहे, जी गुरुवार अर्थात 8 सप्टेंबरपासून मध्य रेल्वेने सुरु केली आहे. या विशेष एक्सप्रेसचा फायदा हा, ज्यांना एसटी किंवा अन्य एक्स्प्रेसमध्ये गावी जाण्यासाठी तिकीट मिळाले नाही, त्यांना होणार आहे. ही एक्सप्रेस 8 सप्टेंबरपासून दररोज धावत असून, यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे, असा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे. 

असे असतील थांबे?
15087-15088  क्रमांकाही ही एक्स्प्रेस असून जी दररोज धावणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही एक्सप्रेस सीएसएमटी, दादर, पनवेल, पेण, रोहा, माणगाव,वीर, खेड, चिपळून, सावर्डा,आरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली,विलवडे, राजापूर रोज, वैभववाडी रोज, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या सर्व स्थानकांवर थांबेल.

जाणून घ्या वेळापत्रक
8 सप्टेंबरपासून धावणारी ही एक्स्प्रेस सीएमएमटी ते सावंतवाडी (15087) ही मुंबई सीएसएमटीवरुन रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी सुटेल. तर ठाण्यात मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी पोहोचेल, पनवेल स्थानकात ही एक्स्प्रेस पहाटे 1 वाजून 30 मिनिटांनी पोहोचणार असून रत्नागिरीला सकाळी 7 वाजून 30 ला, कणकवलीला सकाळी 10 वाजून 02 मिनिटांनी आणि सावंतवाडी रोडला दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.

दुसरीकडे सावंतवाडी ते सीएसएमटी (15088) ही एक्स्प्रेस परतीच्या प्रवासात सावंतवाडी रोडहून सायंकाळी पाच वाजता निघेल. कुडाल या स्थानकावर ही गाडी 5 वाजून 38 मिनिटांनी तर कणकवणलीला 6 वाजून 20 मिनिटांनी, रत्नागिरी रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी, चिपळूणला रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी मार्गे ठाण्यात पहाटे 5 वाजून 49 मिनिटांनी वाजता आणि शेवटे स्थानक म्हणजे सीएसएमटीला सकाळी 6 वाजून 40 मिनिटांला पोहोचेल.

वेळापत्रकात होणार 'हा' बदल
महत्त्वाची गोष्ट म्हणजे 21 ऑक्टोबरपासून बिगरपावसाळी वेळापत्रक या एक्स्प्रेससाठी लागू होणार आहे. ज्यात सीएसएमटीहून ही एक्स्प्रेस सुटण्याची वेळ रात्री 11 वाजून 55 राहील आणि सावंतवाडीला दुपारी 1 वाजून 50 ऐवजी 2 .15 वाजता पोहोचले. परतीच्या प्रवासात ही गाडी सावंतवाडी रोडहून सायंकाळी 5 ऐवजी 5 वाजून 20 मिनिटांनी सुटेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number