Pune MAHADA Lottery : फक्त 13 लाखांपासून फ्लॅट मिळवा! म्हाडाची पुणेसह ‘या’ प्राईम सिटीमध्ये मेगा लॉटरी; अर्ज करण्याची शेवटची तारीख?

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पाहत असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाने घरांसाठी जाहीर केलेल्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत ही वाढवलेली आहे

Pune MAHADA Lottery : फक्त 13 लाखांपासून फ्लॅट मिळवा! म्हाडाची पुणेसह ‘या’ प्राईम सिटीमध्ये मेगा लॉटरी; अर्ज करण्याची शेवटची तारीख?

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पाहत असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ अर्थात म्हाडाने 4 हजार 462 घरांसाठी जाहीर केलेल्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत ही वाढवलेली आहे. त्यामुळे आता ज्या नागरिकांना अर्ज करता आलेला नाही, त्यांना अजून एक संधी मिळालेली आहे.

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये घर घेण्याची संधी दवडू नका
या लॉटरीसाठी नागरिकांना अर्ज करण्याची आधी अंतिम तारीख ही 15 सप्टेंबर देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत एक महिन्याने वाढवली असून आता नागरिक 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतील. म्हाडाच्या या लॉटरीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, ऑनलाइन अर्ज करताना बऱ्याच अर्जदारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच मुळे म्हाडाने अर्जाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

Jejuri Gad Viral Boy : जेजुरीच्या खंडोबा गडावरचा छोटा 'शुभम', सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल; मात्र समोर आली त्याची स्तब्ध करणारी स्टोरी

कुठे किती घरांचा समावेश?
म्हाडाच्या पुणे विभागातीलल या लॉटरीमध्ये पुणे महापालिका क्षेत्रातील तब्बल 1,468 तर पिंपरी-चिंचवडमधील 1,406 आणि पीएमआरडीए क्षेत्रातील 1,588 घरांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या घरांच्या किंमती फक्त 13 लाखांपासून सुरु होत असल्याची माहिती समोर येत आहे.

EWS-LIG साठी उत्पन्नाची नवी अट
EWS गटासाठी वार्षिक उत्पन्न हे 6 लाख रुपयांपर्यंत आहे तर LIG गटासाठी 9 लाख रुपयांपर्यंत उत्नन्न असणे आवश्यक आहे. नागरिकांसाठी उत्पन्नाचा पुरावा हा 1 ऑगस्ट 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीतील असावा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number