मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या घरी बाप्पाच्या आगमनाची लगबग ही सुरु झालेली आहे. सजावट, पूजा साहित्य आणि खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढलेली आहे. गणेशोत्सव असो,दिवाळी असो किंवा दसरा शुभ मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आजही कायम आहे. यंदाही असंख्य नागरिक हे सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र,गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसलेली आहे. अशातच आज, 13 सप्टेंबर 2026 रोजी अर्थात रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला आहे.
आज सोने महाग की स्वस्त?
मिळालेल्या माहितीनुसार, आज 13 सप्टेंबर 2026 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर हा 153,250 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 140,479 रुपये आहे. दुसरीकडे 1 किलो चांदीचा दर 234,670 रुपये आहे. शिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 2,347 रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे उत्पादन शुक्ल, राज्य कर, मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती या भारतभर बदलतात. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे आजचा भाव?
पाहा, 4 शहरांमध्ये काय आहेत दर?
1) मुंबई- 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 140.223 रुपये,तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 152,970 प्रति 10 ग्रॅम आहे.
2) पुणे- प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 140,223 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 152,970 रुपये आहे.
3) नागपूर-प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 140,223 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर हा 152,970 रुपये आहे.
4) नाशिक- या शहरात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 140,223 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 152,970 रुपये आहे.
(वर दिलेले दर हे अंदाजे असून योग्य दरासाठी तुमच्या जवळच्या ज्वेलर्ससोबत संपर्क करावा)