Gold Rate Today: सोन्यात पुन्हा 1500 रुपयांनी वाढ, जीएसटीसह आजचे दर किती?

सोमवारी रात्रीतून सोन्याच्या भावात तब्बल 1500 रुपयांची उडी घेतली गेली. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर आता 99,000 रुपयांवर पोहोचला असून, जीएसटीसह हा दर 1,02,000 रुपयांपर्यंत गेला आहे.

Gold Rate Today: सोन्यात पुन्हा 1500 रुपयांनी वाढ, जीएसटीसह आजचे दर किती?

जळगाव: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून, सोमवारी रात्रीतून सोन्याच्या भावात तब्बल 1500 रुपयांची उडी घेतली गेली. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर आता 99,000 रुपयांवर पोहोचला असून, जीएसटीसह हा दर 1,02,000 रुपयांपर्यंत गेला आहे. सोने व्यापाऱ्यांच्या मते, अमेरिका-चीन यांच्यातील वाढती व्यापारतणाव आणि आगामी अक्षय तृतीया, लग्नसराई यामुळे दरात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

जळगाव, नागपूर यासारख्या शहरांमध्येही भाव भरमसाठ वाढताना दिसत आहेत. सोमवारी सकाळी 600 आणि संध्याकाळी पुन्हा 700 रुपयांनी वाढ होऊन जळगावात सोन्याचा दर 97,300 रुपयांवर पोहोचला. जीएसटीसह दर 1,00,219 रुपये झाला. चांदीही 1,200 रुपयांनी वाढून 97,500 रुपये किलोपर्यंत गेली. विशेष म्हणजे, अनेक वर्षांनंतर सोनं आणि चांदीचे दर एका पातळीवर येताना दिसले. नागपुरात तर सोनं जीएसटीसह 1,00,425 रुपये प्रतितोळा झाले.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात तब्बल 6,100 रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे आणि देशांतर्गत वाढलेल्या मागणीमुळे सोनं-चांदीच्या किमती उच्चांक गाठत आहेत. गेल्या काही महिन्यांत सोन्याने 20 टक्क्यांहून अधिक परतावा दिला असून सोनं महाग आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number