Today Gold Rate : गणेशोत्सवाच्या दिवसात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे आज सराफा बाजार सुरु होताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात दागिने किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना सध्या काहीसा दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण
मिळालेल्या माहितीनुसार, आज 12 कॅरेट सोन्याच्या दरात आज तब्बल 9 हजार 200 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1 लाख 53 हजार 170 रुपये इतका झालाय. सोन्याच्या दरात अचानक झालेल्या या घसरणीमुळे खरेदीदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात अन्य सणांसोबत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात सोने, चांदी आणि दागिने खरेदी करण्याला विशेष महत्त्व असते, त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या दिवसात झालेली सोन्याची कट ही असंख्य ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा दर
1) 1 ग्रॅम सोन्याचे दर आज हे 15,313 रुपये
2)8 ग्रॅम इतका सोन्याचा दर हा 1,22,536 रुपये
3)10 ग्रॅम सोन्याचा दर 1,53,170 रुपये
4)100 ग्रॅम सोन्याचे दर आज 15,31,700 रुपये
22 कॅरेट सोन्याचे दर?
1)1 ग्रॅम सोन्याचा दर हा आज 14,040 रुपये
2)8 ग्रॅम सोन्याचे दर 1,12,320 रुपये
3)10 ग्रॅम सोन्याचा दर आज 1,40,400 रुपये
4)100 ग्रॅम सोन्याचा दर 14,04,000 रुपये
18 कॅरेट सोन्याचे दर?
1)1 ग्रॅम सोन्याचा दर हा आज 11,488 रुपये
2)8 ग्रॅम सोन्याचा दर आज 91,904 रुपये
3)10 ग्रॅम सोन्याचा दर हा आज 1,14,880 रुपये
4)100 ग्रॅम सोन्याचा दर हा आज 11,48,800 रुपये
महत्त्वाचे म्हणजे, सोन्याच्या किमतीमध्ये दररोज बदल होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, सोन्याची मागणी, डॉलरचा दर अशा अनेक कारणांचा सोन्याच्या दरावर परिणाम होतो. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदी करण्यापूर्वी आपल्या स्थानिक सराफाला बाजारातील ताजा दर नक्की तपासा.