जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गिरीश महाजन हे मंत्री आहेत की जेम्स बाँड?, असा खोचक सवाल करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज महाजनांवर चांगलाच नेम साधला.
औरंगाबादेतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.
बिबट्यानं कोणावर हल्ला केल्यास हवेत गोळीबार करून त्याला घाबरविण्याच्या दृष्टीने आपण रिवॉल्व्हर जवळ बाळगली होती, असा खुलासा गिरीश महाजनांनी केला आहे.