मविआच्या सभेसाठी जमवाजमव

महाविकास आघाडीतर्फे रविवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या वज्रमूठ सभेच्या आयोजनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी असले तरी सभेच्या यशस्वितेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून ८० टक्के प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. सभेच्या ठिकाणी स्तंभपूजन, सभेचे निमंत्रण, कामाची पाहणी, सोशल मीडियावर कॅम्पेनिंग या सर्व गोष्टींत उद्धव ठाकरे गटाने पुढाकार घेतल्याचे […]

मविआच्या सभेसाठी जमवाजमव

महाविकास आघाडीतर्फे रविवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या वज्रमूठ सभेच्या आयोजनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी असले तरी सभेच्या यशस्वितेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून ८० टक्के प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. सभेच्या ठिकाणी स्तंभपूजन, सभेचे निमंत्रण, कामाची पाहणी, सोशल मीडियावर कॅम्पेनिंग या सर्व गोष्टींत उद्धव ठाकरे गटाने पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पाच आमदारांनी बंडखोरी करत शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यातील दोघांना मंत्रिपददेखील मिळाले. त्याला उत्तर म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद याच शहरात देण्यात आले. त्यामुळे अजूनही उद्धव सेनेची संघटना कायम आहे. त्याच जाेरावर छत्रपती संभाजीनगरात वज्रमूठ सभेचे आयोजन केले आहे. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर उद्धव सेनेच्या आगामी वाटचालीवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे उद्धव सेनेकडून सभेच्या यशस्वितेसाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

या सभेसाठी उद्धव सेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, तर काँग्रेसकडून नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, खासदार रजनी पाटील यांची उपस्थिती असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, राजेश टोपे, संजय बनसोडे, खासदार फौजिया खान यांची उपस्थिती असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number