Special Train: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! कोल्हापूरसाठी तब्बल 4 स्पेशल गाड्यांचे नियोजन ; कुठून अन् कधी धावणार ट्रेन? जाणून घ्या वेळापत्रक

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापुर या दरम्यान तब्बल 4 गणपती विशेष रेल्वे सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे

Special Train:   रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!  कोल्हापूरसाठी तब्बल 4 स्पेशल गाड्यांचे नियोजन ; कुठून अन् कधी धावणार ट्रेन? जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह महाराष्ट्रातल्या अन्य गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठी असते, त्यामुळे सणाच्या दिवसात रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेकडून दरवर्षी विशेष गाड्याचे नियोजन करण्यात येते. यंदाही प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय हा घेण्यात आलेला आहे.

कोणत्या प्रवाशांना होणार फायदा?
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापुर या दरम्यान तब्बल 4 गणपती विशेष रेल्वे सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या स्पेशल गाड्यांचे आरक्षण हे शुक्रवारपासून सुरु होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. या चार विशेष गाड्यांमुळे गणेशोत्सवासाठी कोल्हापूर आणि या मार्गावरील गावांकडे जाणाऱ्या असंख्य प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

हेही वाचा-Pune MAHADA Lottery : फक्त 13 लाखांपासून फ्लॅट मिळवा! म्हाडाची पुणेसह 'या' प्राईम सिटीमध्ये मेगा लॉटरी; अर्ज करण्याची शेवटची तारीख?

प्रवाशांच्या मागणीनुसार गाडी क्रमांक 01497  मुंबई-कोल्हापूर विशेष रेल्वे ही 12 आणि 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी कोल्हापूरल पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01498 ही कोल्हापूर-मुंबई विशेष रेल्वे 12 आणि 14 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर 12 वाजून 5 मिनिटांनी सुटणार आहे. तर ही गाडी त्याच दिवशी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.

'या' स्थानकांवर थांबा
मुंबई-कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या या विशेष एक्स्प्रेसला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा,कराड,किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज अशा एकूण 12 स्थानंकावर थांबा मिळणार आहे.

हेही वाचाkonkan Railway : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी एक्स्प्रेस! कसे असतील थांबे अन् वेळ?, वाचा सविस्तर वेळापत्रक

अशी असेल डब्यांची रचना
या विशेष गाडीमध्ये फस्ट एसी एक कोच, सेंकड एसीचे दोन कोच आणि थर्ड एसीचे तीन कोच असणार आहेत. याशिवाय स्लीपरचे चार आणि जनरलचे चार डबे असणार आहे. तसेच गार्ड कम ब्रेक व्हॅन आणि जनरेटर डब्याचाही समावेश करण्यात आलेला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number