Nagpur : नागपूरकरांना गणेशोत्सवात मोठं गिफ्ट, सर्वात लांब उड्डाणपुलाचे आज लोकार्पण, नेमका मार्ग कुठून कुठपर्यंत? जाणून घ्या

नागपूरकरांसाठी गणेशोत्सवाच्या दिवसात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरातील दररोजची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा सर्वात लांब उड्डाणपूल आजपासून नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे

Nagpur : नागपूरकरांना गणेशोत्सवात मोठं गिफ्ट, सर्वात लांब उड्डाणपुलाचे आज लोकार्पण, नेमका मार्ग कुठून कुठपर्यंत? जाणून घ्या

नागपूर : नागपूरकरांसाठी गणेशोत्सवाच्या दिवसात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरातील दररोजची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा सर्वात लांब उड्डाणपूल आजपासून नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हे लोकार्पण केले जाणार आहे.

नेमका मार्ग कुठून कुठपर्यंत?
मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरा चौक ते दिघोरी चौक या मार्गावर हा नवा भव्य उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. शहराच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. उड्डाणपूल सुरु झाल्यानंतर या भागातील दररोजची वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास हा अधिस सोपा होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा-Maharashtra Weather Update : ऊन-पावसाचा खेळ सुरूच; आज राज्यातील कोणत्या भागात पाऊस बरसणार; विकेंडला काय स्थिती?

हा सर्व प्रकल्पाचे काम हे दाट लोकवस्ती आणि शहरातील जुन्या भागातून केले आहे,त्यामुळे बांधकामादरम्यान असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. त्यात अरुंद असलेल्या रस्त्यांमधूनच अवजड यंत्रसामग्रीची वाहतूक करावी लागत असल्याने स्थानिक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. पण आता काम पूर्ण झाल्याने नागरिकांना या समस्यांपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

उड्डाणपुलाची खास वैशिष्ट्ये
सर्वात लांब उड्डाणपूलाची लांबी ही सुमारे 9.8  किलोमीटर असून रुंदी ही 12 मीटर आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 998 कोटी रुपयांचा खर्च ही करण्यात आला आहे. हा उड्डाणूल सलग नसून अनेक महत्त्वाच्या जागी लँडिंग देण्यात आली आहे.या उड्डाणपुलाचा सुमारे 3 किलोमीटरचा भाग हा यूएचपीएफआरसी गर्डर्सवर उभारण्यात आलेला आहे. अशोत चौकात उंचावलेली रोटरी देण्यात आली असून मध्यभागी उंचावर अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभाला अशोक चक्रातील 24 आरे देण्यात आले आहेत.

हेही वाचा-Railway Update : मोठी बातमी! इंटरसिटी अन् सिद्धेश्वर एक्स्प्रेस रद्द; काही गाड्यांचे मार्गही बदलले; जाणून घ्या टाइमटेबल

नागपूरच्या नव्या उड्डाणपुलाचे नाव काय?
आरएसएस स्थापनेच्या तब्बल 100 व्या वर्षानिमित्त या उड्डाणपुलाला 'डॉ.केशव बळीरामपंत हेडगेवार' यांचे नाव देण्यात आलेले आहे. खरं तर एप्रिल 2026 पर्यंतच हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार होता. मात्र, कामाला उशीर झाल्यामुळे त्याचे आज लोकार्पण होत आहे. आता हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर नागपूरकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number