Pune Ganeshotsav : मंगलमय सुरुवात! अथर्वशीर्षाच्या मंत्रोच्चाराने पहाटेपासून पुणे दुमदुमणार; ऋषिपंचमीला 35 हजार महिलांचा महासहभाग

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने आज ट्रस्टच्या  134 व्या वर्षीच्या गणेशोत्सावानिमित्ताने ऋषिपंचमीच्या दिवशी तब्बल 35 हजार महिलांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण हे आयोजित करण्यात आलेल

Pune Ganeshotsav : मंगलमय सुरुवात! अथर्वशीर्षाच्या मंत्रोच्चाराने पहाटेपासून पुणे दुमदुमणार; ऋषिपंचमीला 35 हजार महिलांचा महासहभाग

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा यावर्षीही मोठी उत्साहात पाहायला मिळणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने आज ट्रस्टच्या  134 व्या वर्षीच्या गणेशोत्सावानिमित्ताने ऋषिपंचमीच्या दिवशी तब्बल 35 हजार महिलांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण हे आयोजित करण्यात आलेले आहे. गेल्या अनेक वर्षांप्रमाणेच यंदाही असंख्य महिला या धार्मिक उपक्रमात सहभागी होणार आहेत.

पुण्यात ऋषिपंचमीचा भव्य सोहळा
ऋषिपंचमीनिमित्त पहाटे 6 वाजल्यापासून या आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात होणार आहे. हजारो महिला एकत्र येत सामूहिक मंत्रोच्चार करतील, त्यामुळे संपूर्ण परिसर पहाटेपासून भक्तिमय होणार आहे. गणेशोत्सवातील हा विशेष धार्मिक सोहळा पाहण्यासाठी तसेच याचा अनुभव घेण्यासाठी आज भाविकांचीही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. श्री गणपाती अथर्वशीर्ष पठणाला गणेशभक्तांमध्ये विशेष महत्त्व असून, गणेशोत्सवाच्या दिवसात या खास उपक्रमाला मोठा प्रतिसाद  मिळतो.

हेही वाचा-Ganga Aarti Thames River London : लंडनच्या थेम्स नदीवर वाराणसीच्या धर्तीवर भव्य 'गंगा आरती'; हजारो भाविक एकत्र, हे होतं निमित्त

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात अनेक धार्मिक, सामाजिनक तसेच सांस्कृतिक उपक्रमांते आयोजन केले जाते. त्याच परंपरेचा एक भाग म्हणून ऋषिपंचमीच्या दिवशी 35 हजार महिलांचे सामुदायिक अथर्वशीष पठण हे आजोजित करण्यात आलेले आहे. मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग हेच या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे तसेच विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांती प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात असंख्य महिलांकडून एकाच वेळी होणाऱ्या या पठणामुळे पुणे शहरात गणेशभक्तीचा अनोखा अनुभव पाहायला मिळणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number