वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रशियातील लिबीडियान शहरात चक्क फळांच्या रसाची नदी पाहायला मिळाली. मॉस्कोपासून काही दूर असलेल्या लिबीडियान शहरात पेप्सिको कंपनीचा प्लांट आहे.
कंपनीचे छत कोसळून फळांचे रस साठवून ठेवलेल्या टाक्या फुटल्या. या टाक्यांमध्ये जवळपास 280 लाख लीटर फळांच्या रसाची साठवण केली होती.
टाक्या फुटल्याने हा सारा रस रस्त्यावर वाहून गेला. रसाचे पाटच रस्त्यावर वाहू लागले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांनाही यामुळे अडचणी येत होत्या.
याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अपघातामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान झालेच आहे. पण लाखो लिटर रसाचीदेखील नासाडी झाली आहे.
तसेच या अपघातात दोन कामगार जखमी देखील झाले आहेत.