बुलढाण्यात 4 चिमुकल्यांसह आईचा मृतदेह विहिरीत सापडला

बुलढाणा जिल्ह्यातील माळेगावात एका विहिरीत आईसह चार मुलींचे मृतदेह आढळले आहेत. या घटनेमुळे या परिसरात खळबळ माजली आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याबाबतीत शंका व्यक्त केली जात आहे. पोलीसांचा तपास सुरू आहे. नेमकं काय घडलं? बुलढाण्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडला आहे. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव इथे हा प्रकार घडला […]

बुलढाण्यात 4 चिमुकल्यांसह आईचा मृतदेह विहिरीत सापडला

बुलढाणा जिल्ह्यातील माळेगावात एका विहिरीत आईसह चार मुलींचे मृतदेह आढळले आहेत. या घटनेमुळे या परिसरात खळबळ माजली आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याबाबतीत शंका व्यक्त केली जात आहे. पोलीसांचा तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

बुलढाण्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडला आहे. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव इथे हा प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.आईसह 4 मुलींचा मृतदेह विहिरीत आढळला आहे. या सगळ्या गंभीर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गावाच्या एका विहिरीमध्ये हे 5 मृतदेह आढळले आहेत. यात एक मृतदेह महिलेचा तर त्यासोबत 4 चिमुकल्यांचा मृतदेह आढळला आहे. मृतांमध्ये आई आणि 4 मुली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आई उज्वला ढोके वय 35 वर्ष, मुलगी वैष्णवी ढोके 9 वर्ष, दुर्गा ढोके 7 वर्ष, आरुषी ढोके 4 वर्ष , पल्लवी धोके 1 वर्ष यांचा समावेश आहे. एकाच घरातील चौघींचा मृतदेह विहिरीत सापडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू असून त्या नंतर शवविच्छेदन साठी पाठविण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number