‘डीजे’वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते

डीजे लावण्यावरून पुण्यातील टिळक रस्त्यावर पोलीस आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते भिडले. टिळक रस्त्यावरील एस पी महाविद्यालयासमोर एका गणेश मंडळासमोर डीजेचा दणदणाट सुरू होता. यावेळी त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आवाज कमी करण्याचे आवाहन केले. परंतु मंडळाच्या कार्यकर्त्यांनी न ऐकता डीजेचा दणदणाट सुरूच ठेवला. त्यानंतर पोलिसांनी स्वतः वर चढून डीजे बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यकर्ते […]

‘डीजे’वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते

डीजे लावण्यावरून पुण्यातील टिळक रस्त्यावर पोलीस आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते भिडले.

टिळक रस्त्यावरील एस पी महाविद्यालयासमोर एका गणेश मंडळासमोर डीजेचा दणदणाट सुरू होता. यावेळी त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आवाज कमी करण्याचे आवाहन केले. परंतु मंडळाच्या कार्यकर्त्यांनी न ऐकता डीजेचा दणदणाट सुरूच ठेवला.

त्यानंतर पोलिसांनी स्वतः वर चढून डीजे बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळासाठी या रस्त्यावरील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. काही वेळाने पुन्हा मर्यादित आवाज ठेवत डीजे चालू करण्यात आला आणि मिरवणूक मार्गस्थ झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number