EVM मध्ये छेडछाड होत असल्याचा मुद्दा विरोधकांनी अनेकदा उपस्थित केला आहे.
यामुळे 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे.
मतमोजणी करण्यापूर्वी मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणी व्हावी.
तसेच पडताळणी करताना काही अढळल्यास व्हीव्हीपॅटची संपूर्ण पडताळणी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
EVM ची छेडछाड झाल्याची तक्रार आल्या असून निवडणूक आयोगाने त्वरीत यावर पाऊल उचलावे अशीही कॉंग्रेस पक्षाने मागणी केली.
यासंदर्भात निवडणूक आयोगाने बैठक घेतली.
मात्र बैठकीमध्ये निवडणूक आयोगाने मागणी फेटाळली आहे.
निवडणूक आयोगाने मागणी फेटाळल्यामुळे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याता प्रयत्न केला.
आपण सत्यासाठी लढत आहोत म्हणून घाबरून जाऊ नका.
फेक एक्झिट पोलवर विश्वास ठेऊ नका.
पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत, असे ट्विटकरून राहुल गांधींनी कार्यकर्त्यांना आवाहन दिले हे.
कांग्रेस पार्टी के प्रिय कार्यकर्ताओं , अगले 24 घंटे महत्वपूर्ण हैं। सतर्क और चौकन्ना रहें। डरे नहीं। आप सत्य के लिए लड़ रहे हैं । फर्जी एग्जिट पोल के दुष्प्रचार से निराश न हो। खुद पर और कांग्रेस पार्टी पर विश्वास रखें, आपकी मेहनत बेकार नहीं जाएगी। जय हिन्द। राहुल गांधी — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 22, 2019