Sunetra Pawar : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर; सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी लागणार?

नवी दिल्ली : सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील खासदारकीच्या राजीनाम्यानंतर आता पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सुनेत्रा पवारांसह तामिळनाडूतील एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. येत्या 8 जूनपर्यंत राज्यसभेसाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. तर 18 जूनला रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या […]

Sunetra Pawar : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर; सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी लागणार?

नवी दिल्ली : सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील खासदारकीच्या राजीनाम्यानंतर आता पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सुनेत्रा पवारांसह तामिळनाडूतील एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. येत्या 8 जूनपर्यंत राज्यसभेसाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. तर 18 जूनला रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या जागी राष्ट्रवादीतून कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : Maharashtra Election Commission : SIR बाबत राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती; पात्र मतदाराचं नाव वगळणार नाही, एस. चोकलिंगम यांची ग्वाही

राज्यसभेच्या एकूण 24 जागांसाठी निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली असून या 24 जागांवर 18 जून रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रासह एकूण 10 राज्यांतील खासदार निवृत्त झाले आहेत. तर काहींनी राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली होती. ही जागा राष्ट्रवादीलाच मिळणार असून आता अजित पवार गटातील कोणत्या नेत्याची लॉटरी लागणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, या एका जागेसाठी लॉबिंग सुरू झाल्याचे समजते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number