कौटुंबिक भांडणातून बापाने केली मुलाची गळा आवळून हत्या

नाशिक शहरात बाप-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नाशिक येथील आम्रपाली परिसरात रागाच्या भरात वडिलाने स्वतःच्या 9 वर्षांच्या मुलाचा गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे.

कौटुंबिक भांडणातून बापाने केली मुलाची गळा आवळून हत्या

नाशिक: नाशिक शहरात बाप-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नाशिक येथील आम्रपाली परिसरात रागाच्या भरात वडिलाने स्वतःच्या 9 वर्षांच्या मुलाचा गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. इतकंच नाही तर, या हत्येनंतर बापाने मुलाचा मृतदेह गोणीत टाकून सासूरवाडीला नेत पलंगावर टाकल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या आरोपीचे नाव सुमित पुजारी आहे. घटनेनंतर नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी नाशिक गुन्हे शाखेचे शोधपथक रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा: काॅंग्रेसचा का हाथ पाकिस्तान के साथ; काॅंग्रेसच्या पोस्टला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर

नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून, एका बापाने आपल्या 9 वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर, मुलाला एका पोत्यामध्ये भरून नराधमाने सासूरवाडीला नेत तिथल्या पलंगावर टाकल्याची संतापजनक घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा प्रकार निदर्शनात येताच परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. उपनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून सध्या सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात ही हत्या कौटुंबिक कारणांमुळे झाल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरात सुमित पुजारी (वय: 35) याने मुलाचा गळा आवळून खून केला.

मिळालेल्या माहितीनुसार, घरात नेहमी वादाचे वातावरण असायचे. काही दिवसांपासून आरोपी तणावाखाली होता. कौटुंबिक कलह वाढल्यामुळे त्याने मुलाचा गळा आवळून त्याचा खून केले. वाद नक्की का झाला, इतका टोकाचा निर्णय का घेतला, हे तपासानंतर उघडकीस येईल. सध्या नाशिक गुन्हे शाखेचे शोधपथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number