Dr Yasmine Shaikh Death: मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लढा देणाऱ्या डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एक निष्ठावंत अभ्यासक आणि भाषेची शुद्धता जपणारी ज्ञानतपस्वी हरपल्याची भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Dr Yasmine Shaikh Death: मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लढा देणाऱ्या डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr Yasmine Shaikh Death:  मराठी व्याकरणाचा पाया भक्कम करणाऱ्या आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या थोर विदुषी डॉ. यास्मिन शेख यांचे वयाच्या 101 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. सोमवारी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या या एक्झिटमुळे मराठी भाषा, साहित्य आणि व्याकरण जगतात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. एक निष्ठावंत अभ्यासक आणि भाषेची शुद्धता जपणारी ज्ञानतपस्वी हरपल्याची भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना या दोन कन्या असा आप्तपरिवार आहे.

जेरुषा रुबेन ते डॉ. यास्मिन शेख: एक अनोखा आणि प्रेरणादायी जीवनप्रवास

डॉ. यास्मिन शेख यांचा जन्म एका ज्यू कुटुंबात झाला होता आणि त्यांचे मूळ नाव जेरुषा रुबेन असे होते. नाशिकमध्ये वास्तव्यास असताना प्रसिद्ध साहित्यिक वसंत कानेटकर यांच्या मध्यस्थीने त्यांची ओळख अझीझ अहमद इब्राहिम शेख या मुस्लिम तरुणाशी झाली. 1950 मध्ये त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला. विवाहानंतर त्यांनी स्वतःचा मूळ धर्म न बदलता केवळ 'यास्मिन शेख' हे नाव अंगीकारले. प्रा. श्री. म. माटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेल्या यास्मिन यांनी पुढे श्री. पु. भागवत आणि वसंत कानेटकर यांसारख्या महान साहित्यिकांच्या सहवासात स्वतःला मराठी भाषेच्या सेवेत पूर्णपणे झोकून दिले.

प्रमाण भाषेचा आग्रह आणि परकीय शब्दांच्या आक्रमणावर परखड मत

मराठी भाषेच्या पावित्र्याविषयी डॉ. शेख कायम अत्यंत आग्रही आणि संवेदनशील होत्या. दैनंदिन संभाषणात परकीय शब्दांची होणारी भेसळ ही मराठी भाषेचे सौंदर्य आणि अस्तित्व धोक्यात आणत आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. बोलचाल किंवा बोलीभाषा कोणतीही असली, तरीही वैचारिक, शैक्षणिक आणि ललित साहित्यात केवळ शुद्ध आणि प्रमाण मराठीचाच वापर झाला पाहिजे, या तत्त्वाशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.

हेही वाचा – Sagar Mali Bodybuilder Death: आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर सागर माळी यांचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन; 'या' आजाराने घेतला बळी

34 वर्षांचे अध्यापन, IAS अधिकाऱ्यांना धडे आणि बालभारतीत अमूल्य योगदान

डॉ. यास्मिन शेख यांनी जवळपास 34 वर्षे अध्यापन क्षेत्रात प्रदीर्घ सेवा बजावली. मुंबईच्या सायन येथील SIES कॉलेजमध्ये त्यांनी 6 वर्षे मराठी विभागप्रमुख म्हणून धुरा सांभाळली. यासोबतच, 'स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर'मध्ये भावी IAS अधिकाऱ्यांना 10 वर्षे मराठी व्याकरण आणि भाषाशास्त्राचे धडे दिले. बालभारतीच्या पाठ्यपुस्तक मंडळात 7 वर्षे संपादक म्हणून काम करताना त्यांनी 'कार्यात्मक व्याकरण' या अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या या महान योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना प्रतिष्ठित 'डॉ. अशोक केळकर पुरस्कारा'ने सन्मानित केले होते, तसेच 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number