Trump warns China : ‘चीनने इराणला शस्त्रे दिली तर महागात पडेल..’; अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर ट्रम्प यांचा थेट इशारा

तात्पुरता युद्धविराम करार अंमलात असतानाही, दोन्ही अमेरिका आणि इराण या देशांनी आखाती परिसरात मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केले आहे. अशात चीनने इराण केलेली कोणतीही लष्करी मदत आगीत तेल ओतणारी ठरू शकते.

Trump warns China : ‘चीनने इराणला शस्त्रे दिली तर महागात पडेल..’; अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर ट्रम्प यांचा थेट इशारा

America-Iran Ceasefire in Trouble : अमेरिका आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांचा युद्धविराम धोक्यात आला असून, आता या वादात चीनची एन्ट्री झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला कडक इशारा दिला आहे की, जर त्यांनी इराणला हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defence Systems) किंवा कोणत्याही प्रकारचा शस्त्रास्त्र पुरवठा केला, तर बीजिंगला 'मोठ्या संकटाचा' सामना करावा लागेल. व्हाईट हाऊसबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी हे विधान केले, ज्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ माजली आहे.

गुप्तचर यंत्रणांचा खळबळजनक अहवाल
एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना असे संकेत मिळाले आहेत की, येत्या काही आठवड्यांत चीनकडून इराणला अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली मिळू शकते. विशेष म्हणजे, चीन पाठवत असलेल्या या शस्त्रास्त्रांचा मूळ स्त्रोत लपवण्यासाठी तिसऱ्या देशांच्या मार्गे ही वाहतूक करण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणची हवाई संरक्षण क्षमता मोठ्या प्रमाणात विसकळीत झाली होती, ती पुन्हा उभी करण्यासाठी इराण वेगाने हालचाली करत आहे. सध्या मध्यपूर्वेतील वातावरण आणि युद्धविराम दोन्हीही नाजूक स्थितीत पोहोचलेले आहेत. अशात इराण-चीन यांच्यात शस्त्रास्त्रांचा व्यापार होणे ही बाब अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण करू शकते.

युद्धविराम आणि लष्करी हालचाली
तात्पुरता युद्धविराम करार अंमलात असतानाही, दोन्ही देशांनी आखाती परिसरात मोठ्या प्रमाणात लष्करी तैनात ठेवली आहे. अमेरिकन युद्धनौका आणि सैन्य इराणच्या सीमेजवळ हाय अलर्टवर आहेत. अशा स्थितीत चीनकडून मिळणारी कोणतीही लष्करी मदत वॉशिंग्टनकडून मोठी चिथावणी मानली जाऊ शकते. याचा परिणाम पुढील महिन्यात होणाऱ्या ट्रम्प यांच्या नियोजित चीन दौऱ्यावर आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी होणाऱ्या चर्चेवरही होऊ शकतो.

हेही वाचा – Iran US War: 21 तासांचा मॅरेथॉन संवाद, पण तोडगा काहीच नाही; अमेरिका-इराण शांतता चर्चा फिस्कटली

चीनने आरोप फेटाळून लावले
वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाने अमेरिकेचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "चीनने या संघर्षातील कोणत्याही पक्षाला कधीही शस्त्रे पुरवलेली नाहीत. अमेरिकेने निराधार आरोप करून सनसनाटी पसरवणे थांबवावे," असे स्पष्टीकरण चीनने निवेदनाद्वारे दिले आहे. पाश्चात्य देशांच्या कडक निर्बंधांचा सामना करणाऱ्या इराणसाठी चीन आणि रशिया हे सर्वात महत्त्वाचे धोरणात्मक भागीदार राहिले आहेत, जे त्यांना राजनैतिक आणि आर्थिक पाठबळ देत असतात.

जागतिक बाजारपेठेवर युद्धाचे सावट
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव केवळ लष्करी नसून तो आर्थिकही आहे. जर चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध या मुद्द्यावरून बिघडले, तर त्याचा मोठा फटका जागतिक पुरवठा साखळीला बसू शकतो. ट्रम्प यांनी चीनला दिलेला हा इशारा केवळ इराणपुरता मर्यादित नसून, तो चीनच्या वाढत्या जागतिक प्रभावाला रोखण्याचा एक प्रयत्न असल्याचेही मानले जात आहे.

हेही वाचा – Israel Iran War: 'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; बेंजामिन नेतन्याहूंचा इराणला सज्जड इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number