जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
देव तारी त्याला कोण मारी ही म्हण सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांनी खरी करुन दाखवलीय. या डॉक्टरांनी लोखंडी रॉड पायातून आरपार गेलेल्या मजुराला अक्षरश: मृत्यूच्या दारातून खेचून आणलंय. तब्बल चार फुटांचा रॉड या मजुराच्या पायातून आरपार गेला होता.
यावेळी रुग्ण दगावतो की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच हालचाल केली आणि राम यादव हा आपल्या पायावर उभा आहे. ही कठीण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात डॉक्टरांना यश आलंय.