Nanded News : नांदेडमध्ये धक्कादायक घटना! पहाटे क्लासच्या आवारात कोचिंग क्लासचे संचालक दिसले भयानक अवस्थेत; नेमकं काय घडलं?

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालक एन. टी. जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Nanded News : नांदेडमध्ये धक्कादायक घटना! पहाटे क्लासच्या आवारात कोचिंग क्लासचे संचालक दिसले भयानक अवस्थेत; नेमकं काय घडलं?

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालक एन. टी. जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे त्यांच्या ट्युशनच्या परिसरातील चिंचेच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.

माहिती मिळताच नागरिक, माजी विद्यार्थी, पालक, परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी घटनास्थळी गर्दी केली होती. एन. टी. जाधव हे शिक्षण क्षेत्रातील शांत, संयमी  शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनामुळे हिमायतनगर शहरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, विविध अंगांनी पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा- Raid On ARTO: भिंतीत सोनं अन् बेडमध्ये नोटांचा खजिना… माजी ARTO अधिकाऱ्याच्या घरात दक्षता विभागाचा छापा

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना ट्युशन परिसरातील चिंचेच्या झाडाला जाधव यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

तसेच काही दिवसांपूर्वी त्यांच्या शाळेची मान्यता रद्द झाल्यामुळे ते मानसिक तणावात असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र या सर्व बाबींना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. दरम्यान शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number