Amravati Farmer Loan Issue : अमरावतीत कर्जमाफी होऊनही कृषी कर्ज देण्यास बँकेकडून टाळाटाळ; यशोमती ठाकूर यांना संताप अनावर

कर्जमाफी होऊन देखील शेतकऱ्यांना नव्याने कृषी कर्ज देण्यास बँकांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Amravati Farmer Loan Issue : अमरावतीत कर्जमाफी होऊनही कृषी कर्ज देण्यास बँकेकडून टाळाटाळ; यशोमती ठाकूर यांना संताप अनावर
अमरावतीत शेतकऱ्यांना नव्याने कृषी कर्ज देण्यास बँकांकडून टाळाटाळ

कर्जमाफी होऊन देखील शेतकऱ्यांना नव्याने कृषी कर्ज देण्यास बँकांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या नेरपिंगळीई येथील सेंट्रल बँक येथील धक्कादायक प्रकार घडला आहे.

मोर्शी तालुक्यातील कवठा येथील अल्पभूधारक सतीश वानखडे नामक शेतकरी सेंट्रल बँकेमध्ये दोन महिन्यांपासून चकरा मारत होता. कर्जमाफी झाल्याने जुन्या कर्जाचा बोजा कमी झाल्यानंतर शेतीच्या पुढील हंगामासाठी आवश्यक असलेले पीककर्ज किंवा कृषी कर्ज सहज उपलब्ध होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्याची होती.

Raj Thackeray : निवडणूक आयोगातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताच राज ठाकरेंची परखड पोस्ट; दोन आयुक्तांचे कौतुक, ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल

कवठाळ येथील अल्पभूधारक शेतकरी सतीश वानखडे यांच्याकडे 75 हजार रुपयांचे कर्ज होते. सतीश वानखेडे या शेतकऱ्याकडे असलेले 75 हजार रुपयांचे पीक कर्ज माफ झाले असून त्यांना नव्याने पीक कर्ज देण्यासाठी बँकेने टाळाटाळ केल्याचा आरोप सतीश यांनी केला. त्यानंतर शेतकरी सतीश वानखडे यांनी घडलेल्या प्रकाराची दखल घेण्यासाठी आणि मदतीसाठी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडे धाव घेतली.

घटनेचा आढावा घेतल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जासाठी टाळाटाळ करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी फोनवरून चांगलच सुनावल्याचं समोर आलं आहे. तसेच शेतकऱ्यांना त्रास द्याल तर बँक फोडून टाकेल, अशा आक्रमक शब्दात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संबंधित बॅंकेला इशारा दिला.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number