दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात आलं.
किसान क्रांती पदयात्रेतील शेतकऱ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. भारतीय किसान यूनीयनच्या नेतृत्वात हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झालेत.
दरम्यान उत्तर प्रदेश आणि दिल्लीतच्यी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखलं. मोर्चाला पांगवण्यासाठी पोलिस बळाचा वापर करत आहेत. पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. मोर्चा दाखल होण्यापुर्वी दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली होती. शेतकरी नेते महेंद्र सिंह टिकेत यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा किसान क्रांती पदयात्रा काढण्यात आला, या मोर्चात टिकेत यांचा परिवार सहभागी झालाय.