दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली. दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीची अधिघोषणा १४ जानेवारीला करण्यात येणार आहे. दिल्लीत एकूण ७० जागांसाठी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला […]

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली.

दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीची अधिघोषणा १४ जानेवारीला करण्यात येणार आहे.

दिल्लीत एकूण ७० जागांसाठी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.

उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची २१ जानेवारी शेवटची तारीख असणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी असणार आहे.

दिल्लीत एकूण २६८९ ठिकाणी १३ हजार ७५० मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दिल्लीत एकूण १ कोटी ४६ लाख मतदार आहेत.

विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारीला संपत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number