‘नंदकिशोर चतुर्वेदींना फरार घोषित करा’ – किरीट सोमैया

महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक नवीन घोटाळा समोर आणणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीय सोमैया यांनी दिला  होता. त्यानुसार आज सोमैयांनी नव्या घोटाळ्याबाबत खुलासा केला आहे. ‘हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांना कुठे लपवलं आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे. अन्यथा, हवाल किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांना फरार घोषित करण्याची मागणी’, किरीट सोमैय्या यांनी केली आहे. किरीट […]

‘नंदकिशोर चतुर्वेदींना फरार घोषित करा’ – किरीट सोमैया

महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक नवीन घोटाळा समोर आणणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीय सोमैया यांनी दिला  होता. त्यानुसार आज सोमैयांनी नव्या घोटाळ्याबाबत खुलासा केला आहे. ‘हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांना कुठे लपवलं आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे. अन्यथा, हवाल किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांना फरार घोषित करण्याची मागणी’, किरीट सोमैय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लवपले आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, श्रीधर पाटणकर यांच्याशी चतुर्वेदे व्यवहार समोर आले आहेत. तसेच त्यांच्या अनेक कंपन्या एकाच पत्त्यावर असून नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहेत, त्यांना फरार घोषित करावे, अशी मागणी सोमैयांनी केली आहे.

तसेच पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम ही कंपनी आहे. ही कंपनी पाटणकर यांची असून या कंपनीत आर्थिक गैरव्यवहार करत पैसे आले आहेत. या कंपनीत २९ कोटी काळा पैसा गुंतवला आहे. त्यामुळे या कंपनीचा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काय संबंध आहे, त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असेही किरीट सोमैय्या म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number