जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
सुपरहीरोची क्रेज हि लहान मुलांपासुन, तरुणांपर्यंत आहे, आणि ती काही नवी बाब नाही. त्यातंच प्रेक्षकांना आणखी वेड लावण्यासाठी 16 मे 2018 रोजी डेडपुल 2 हा सिनेमा येतोय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला. 12 फेब्रुवारी 2016 रोजी पहिला डेडपुल आला होता. सर्वात कमी वेळात डेडपुलच्या कॅरेक्टरने लोकांच्या मनातुन इतर सुपरहिरोंची जागा मागे सारत, आपली एक स्वतंत्र जागा निर्माण केली होती. मार्वलच्या या कॅरेक्टकने फार मोठ्या प्रमाणावर सर्वात जास्त फॅन्स जमा केले. फक्त फॅन्स जमाच नाही केलेत, तर या फॅन्सला डेडपुल2 ची वाट पाहण्यासाठी देखिल भाग पाडले आहे.
टायगर श्रॉफचा, स्पायडर मॅन होम कमिंग आणि वरुण धवनचा कॅप्टन अमेरीका या सिनेमांसाठी दिलेला आवाज भारतातील हॉलिवुड चाहत्यांच्या मनात एक वेगळी छाप सोडुन गेला आहे. पण या हॉलिवुड चाहत्यांना आणखी वेड लावण्यासाठी डेडपुलच्या पात्राला आवाज दिलाय, तो म्हणजे बॉलिवुडचा खिलजी रणवीर सिंग याने. डेडपुल2च्या डबिंगसाठी रणवीर सिंग याला ऑफर देण्यात आली होती. सुरवातीला आपल्या बिझी शेड्युलमुळे रणवीरने डेड पुल 2च्या हिंदी आवृत्तीसाठी नकार दिल्याचं ऐकण्यात आलं होतं. आता मात्र 16 मे रोजी प्रद्रर्शित होत असलेल्या डेडपुल2च्या या ट्रेलरमध्ये रणवीर सिंगचाच आवाज ऐकण्यास मिळाला. जी डेडपुलच्या चाहत्यांसाठी आणि रणवीर सिंगच्या फॅन्ससाठी आनंदाचीच बातमी मानायला पाहिजे.
खोडसर अश्या डेडपुलच्या कॅरेक्टरसाठी, रणवीर सिंगचा आवाज परफेक्ट सुट होतोय, असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे डेडपुल सिनेमामध्ये सतत मस्ती दिसेल, अगदी त्याचप्रमाणे रणवीर आपल्या वास्तविक जिवनात देखिल नेहमी मस्ती मजाकच्या मुडमध्ये राहतो. त्याची नेहमी वेगवेगळे आवाज काढुन मस्ती करण्याची ही कला आता या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहण्यास मिळेल. त्याच्या अशाच हसी- मजाकच्या वृत्तीमुळे डेडपुल 2 च्या डबिंगची ऑफर रणवीरला आली असेल, असं म्हणायला हरकत नाही. डेडपुलची खोडी आणि त्याला रणवीरच्या आवाजाची जोडी चाहत्यांना आणखीच वेड लावेल हे नक्की….