‘पोलखोलविरोधी हिंसाचारात युवासेना’ – प्रवीण दरेकर

महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई पालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपाच्यावतीने पोलखोल अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. चेंबूर कॅम्पयेथील भाजपा कार्यालयात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत रथ यात्रेची सुरूवात होणार होती. मात्र, रथयात्रेच्या आधल्या रात्री रथाची तोडफोड करत नुकसान करण्यात आले. दरम्यान, भाजपा पोलखोल रथ तोडफोड प्रकरणी प्रवीण […]

‘पोलखोलविरोधी हिंसाचारात युवासेना’ – प्रवीण दरेकर

महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई पालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपाच्यावतीने पोलखोल अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. चेंबूर कॅम्पयेथील भाजपा कार्यालयात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत रथ यात्रेची सुरूवात होणार होती. मात्र, रथयात्रेच्या आधल्या रात्री रथाची तोडफोड करत नुकसान करण्यात आले. दरम्यान, भाजपा पोलखोल रथ तोडफोड प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर आरोप केला आहे. रथ तोडफोडी दरम्यान युवासेनेचा पदाधिकारी सीसीटीव्हीत कैद झाला असल्याचे प्रवीण दरेकरांना सांगितले आहे.

पोलखोल रथ तोडफोड प्रकरणी आरोपींवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी दिली होती. अन्यथा, पोलीस स्थानकासमोर ठिय्या करण्याचा इशारा दरेकरांनी दिला होता. त्यानुसार आज याप्रकरणी पोलिसांनी दखल घेत तक्रार नोंदवण्यात आली असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचेही ते म्हणाले. यापैकी युवा सेनेचा एक पदाधिकारीट सीसीटीव्हीत कैद झाला असल्याचे म्हणत दरेकरांनी शिवसेनेवर आरोप केले आहेत.

दरेकर म्हणाले, पोलीस याप्रकरणी खातरजमा करणार आहेत. मुंबई महानगर पालिकेची पोलखोल आम्ही सातत्याने करत आहोत. मात्र, आम्ही भ्रष्टाचाराची पोलखोल केली तर गेल्या २५ वर्षांचा काळा इतिहास जनतेसमोर येईल, म्हणून हे सर्व सुरू असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number