फडणवीसांच्या प्रतिज्ञापत्राचा वाद

विधानसभा निवडणुकांसाठी २०१४ झाली निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या प्रकरणाच्या आरोपाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे हजेरी लावली होती. यादरम्यान फडणवीस यांनी आपली बाजी प्रखरपणे मांडल्याची माहिती त्याचे वकील उदय डबले यांनी प्रसार माध्यमांना दिली. तसेच याप्रकरणाची पुढील सुनावणी आता ६ मे ला होणार आहे. फडणवीस यांनी २०१४ साली […]

फडणवीसांच्या प्रतिज्ञापत्राचा वाद

विधानसभा निवडणुकांसाठी २०१४ झाली निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या प्रकरणाच्या आरोपाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे हजेरी लावली होती. यादरम्यान फडणवीस यांनी आपली बाजी प्रखरपणे मांडल्याची माहिती त्याचे वकील उदय डबले यांनी प्रसार माध्यमांना दिली. तसेच याप्रकरणाची पुढील सुनावणी आता ६ मे ला होणार आहे.

फडणवीस यांनी २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी अॅड. सतीश उके यांनी केला आहे. या प्रकरणात फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली.

या तक्रारीवरील सुनावणी दरम्यान शुक्रवारी उके यांच्या बाजूने युक्तीवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीला न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहावे लागते. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस आज न्यायालयात उपस्थित होते. यादरम्यान अॅड. उदय डबले यांनी न्यायालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे बाजू मांडली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number