Pune Metro Line 3: पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनाची तारीख आता निश्चित झाली आहे.

Pune Metro Line 3: पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला

Pune Metro Line 3:  पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी आणि नागरिकांसाठी अखेर अत्यंत दिलासादायक वृत्त आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनाची तारीख आता निश्चित झाली आहे. अंतिम नियोजनानुसार, ही मेट्रो सेवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या होतेड्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे गणेशखिंड रस्ता आणि हिंजवडी परिसरातील प्रवाशांचा वेळ वाचणार असून, दैनंदिन प्रवासाचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल.

पुढील 10 दिवसांत व्यावसायिक मंजुरी मिळण्याची शक्यता
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड' यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा मार्ग पुण्याच्या मध्यवर्ती भागाला आयटी हबशी जोडणारी 3 री मेट्रो मार्गिका ठरेल. पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून' या संपूर्ण मार्गाची तांत्रिक तपासणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता व्यावसायिक स्तरावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी केवळ अंतिम मंजुरी मिळणे बाकी असून, ही प्रक्रिया पुढील 10 दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.  

प्रकल्पाचा खर्च 20 टक्क्यांनी वाढला 
भूसंपादनातील कायदेशीर अडचणी आणि गणेशखिंड रस्त्यावरील कामांमधील व्यत्यय यामुळे या प्रकल्पाला 1 वर्षापेक्षा अधिक काळाचा लेटमार्क लागला. या विलंबाचा थेट परिणाम प्रकल्पाच्या मूळ अंदाजपत्रकावर झाला असून एकूण खर्च सुमारे 20 टक्क्यांनी वाढला आहे. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे या वाढीव खर्चाचा कोणताही बोजा राज्य सरकार किंवा पुणेकर जनतेवर पडणार नाही. हा सर्व अतिरिक्त आर्थिक भार 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल' ही विकासक कंपनी स्वतः उचलणार आहे.

हेही वाचा – Supriya Sule Nashik: खरातवर टीका, फडणवीसांचं कौतुक; NDAसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या…

संपूर्ण मार्गिका कधी पूर्ण होणार? मार्च 2027 पर्यंत सर्व स्थानके खुली करण्याचे उद्दिष्ट
ऑगस्टच्या सुरुवातीला मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला केला जाणार असला, तरी या संपूर्ण मार्गिकेवरील सर्वच्या सर्व स्थानकांवरून पूर्ण क्षमतेने सेवा सुरू होण्यासाठी प्रवाशांना पुढील वर्षाच्या मार्च 2027 महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे असले तरी, पहिल्या टप्प्यातील सेवा सुरू झाल्यामुळे हिंजवडीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लाखो वाहनधारकांना वाहतूक कोंडीच्या जाचातून तात्काळ आणि अत्यंत मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number