आजपासून गोरेगावपर्यंत हार्बर लोकल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मोठ्या प्रतीक्षेनंतर हार्बर लोकलच्या गोरेगावपर्यंतच्या प्रवासाला आजपासून सुरुवात होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकावर सायंकाळी 7 वाजता हार्बर लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात येईल. तसेच, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर सरकते जिने, पादचारी पूल या प्रवाशी सुविधांचेही लोकार्पण होणार आहे. डिसेंबर 2017 […]

आजपासून गोरेगावपर्यंत हार्बर लोकल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मोठ्या प्रतीक्षेनंतर हार्बर लोकलच्या गोरेगावपर्यंतच्या प्रवासाला आजपासून सुरुवात होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकावर सायंकाळी 7 वाजता हार्बर लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात येईल. तसेच, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर सरकते जिने, पादचारी पूल या प्रवाशी सुविधांचेही लोकार्पण होणार आहे.

डिसेंबर 2017 मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबई शहर परिवहन प्रकल्प अंतर्गत हार्बर विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले होते. लोकलची अनेकदा या मार्गावर चाचणी झाली. पण अडचणींमुळे प्रत्यक्ष लोकल धावण्यास विलंब झाला. हार्बर विस्तारीकरणामुळे दादर आणि अंधेरी स्थानकांवरील गर्दी विभागली जाईल. यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवासी मात्र आनंदी आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number