जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दिलखुशकुमार या दहा वर्षीय मुलाचा उपचारा अभावी मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना पालघर मधून समोर आली आहे. दिलखुशकुमार हा पालघर मधील सिडको येथील रहिवशी होता.
2 जानेवारीला दिलखुशला कुत्रा चावल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल.
मात्र, अचानक तब्येत बिघडल्याने दिलखुशकुमारला ग्रामीण रुग्णालयातून तात्काळ हलवून मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात दाखल करा असं सल्ला डॉक्टरांनी सांगीतल.
दिलखुशकुमारला मुंबईला नेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या, त्यासाठी 108 नंबर ची रुग्नवाहिका मागवण्यात आली, रुग्नवाहिका ही आली.
मात्र कुत्रा चावल्याने मुंबईला जाण्यास रुग्नवाहिका देता येणार नाही असं उत्तर 108 च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल.
त्यानंतर रुग्नवाहिका नसल्याने दिलखुशकुमार वर वेळीच उपचार होऊ शकले नाही आणि त्यामुळेच त्याचा मृत्यु झाल्याचा आरोप दिलखुशकुमार च्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय.