मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली सेंद्रीय शेती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवस मूळगावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे गावच्या यात्रेसाठी आले आहेत. परंतु गावाकडे येताच त्यांनी पहिल्यांदा शेतात जावून पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे.. मी देखील माझ्या शेतात शेंद्रिय शेती केली असून सफरचंद लावण्याचा पहिला प्रयोग दरे येथील शेतात केला असून तो यशस्वी झाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली सेंद्रीय शेती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवस मूळगावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे गावच्या यात्रेसाठी आले आहेत. परंतु गावाकडे येताच त्यांनी पहिल्यांदा शेतात जावून पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे.. मी देखील माझ्या शेतात शेंद्रिय शेती केली असून सफरचंद लावण्याचा पहिला प्रयोग दरे येथील शेतात केला असून तो यशस्वी झाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेतीची जोड दिली तर याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल. एकनाथ शिंदेंनी आयुर्वेदिक शेती देखील केली असून यामध्ये स्ट्रॉबेरी,हळद,सुपारी,आंबे,काजू,जांभूळ,आवळा इत्यादी प्रकारच्या फळांची शेती केली असल्याचे सांगितलंय.

मुख्यमंत्री यांच्या शेतात कोणतंच रासायनिक खत वापरलेलं नाही. त्यांच्या शेतामध्ये लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मिरची, हळद या सह लाल चंदन, बाहेरच्या राज्यात पिकणारे गवती चहा अशा विविध प्रकारच्या झाडांमधून त्यांनी आपली संपूर्ण शेती फुलवली आहे. एकनाथ शिंदेंच्या शेतामध्ये असलेलं गवती चहाचं पिक आगळं वेगळं आहे. या गवती चहाची उंची तब्बल १० फुट आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरे येथील मूळ गावी शेतीची पाहणी केली. त्यांनी चार महिन्यांपूर्वी लावलेल्या स्ट्रॉबेरीला आता लालभडक फळे आली आहेत. ही स्टॉबेरी त्यांनी हाताने तोडून त्याची चव चाखली. रोजच होत असलेलं राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतून ब्रेक घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी शेतात रमले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number