धक्कादायक ! एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू

चंद्रपूर: चंद्रपूरमधील दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यू झाला.जनरेटरमधील धूर गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मृतकांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. रात्री दुर्गापुरातील काही भागातील वीज पुरवठा गेल्याने रमेश यांनी जनरेटर सुरू केला वीज न आल्याने जनरेटर सुरूच होता. रात्री पाऊस सुरू आल्याने रमेश […]

धक्कादायक ! एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू

चंद्रपूर: चंद्रपूरमधील दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यू झाला.जनरेटरमधील धूर गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मृतकांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. रात्री दुर्गापुरातील काही भागातील वीज पुरवठा गेल्याने रमेश यांनी जनरेटर सुरू केला वीज न आल्याने जनरेटर सुरूच होता. रात्री पाऊस सुरू आल्याने रमेश यांनी जनरेटर घरातील आतील भागास ठेवला मात्र त्यामधून निघणारा धूर लष्कर कुटुंबासाठी जीवघेणा ठरला.

मृतांमध्ये अजय लष्कर, रमेश लष्कर, लखन लष्कर, कृष्णा लष्कर, पूजा लष्कर, माधुरी लष्कर यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. दरम्यान डॉक्टर विषबाधेमुळे मृत्यु झाल्याचे सांगत आहे.रात्रीच्या सुमारास झालेल्या या गॅसगळतीमध्ये एकाच कुटुंबातील सातजण बेशुद्ध पडले. त्यामधील एकाचे प्राण वाचले आहेत. गॅस गळतीचं प्रकरण लक्षात आल्यानंतर लष्कर कुटुंबातील सातही जणांना बेशुद्धावस्थेत डॉक्टर विश्वास झाडेंच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिथे सहा जणांना मृत घोषित करण्यात आलं. तर एका सदस्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number