राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  राज्यात जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. मुंबईसह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपले होते. दरम्यान, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. काही मोजक्या ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसाचा जोर […]

राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  राज्यात जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. मुंबईसह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपले होते. दरम्यान, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. काही मोजक्या ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे.

या वर्षी पावसाने चांगली हजेरी लावली. जुलै महिन्यात अनेक ठिकाणी पावसाने सरासरी ओलांडली. दरम्यान, आज देखील राज्यातील काही जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. यात कोकणातील रायगड जिल्ह्या, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा, तर विदर्भातील नागपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गोंदिया जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळं नदी-नाल्यांसह धरणांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार काल दिवसभर देखील पावसाचा जोर कायम होता. त्यामुळं नदी नाले दुधडी भरून वाहू लागले आहेत. अशातच नदीपात्रातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी अशी आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार आहे. शहरात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी माध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे तब्बल ३३ दरवाजे खुले करण्यात आले असून नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदी काठांवर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि नदी नाल्यांना आलेल्या पाण्याची पातळी बघायला कुणीही जावून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number