महिला स्वच्छतागृहात सीसीटिव्ही कॅमेरे

मावळ तालुक्यातील डॉ. डी. वाय. पाटील शाळेत जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. ही बाब शाळेतील मुलींनी पालकांना सांगितली. याबाबत पालकांनी शाळा प्रशासनाला विचारले असता त्यांनी मुख्याध्यापकांनी कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले. हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर मावळ मधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकाला मारहाण केली. […]

महिला स्वच्छतागृहात सीसीटिव्ही कॅमेरे

मावळ तालुक्यातील डॉ. डी. वाय. पाटील शाळेत जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. ही बाब शाळेतील मुलींनी पालकांना सांगितली. याबाबत पालकांनी शाळा प्रशासनाला विचारले असता त्यांनी मुख्याध्यापकांनी कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले.

हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर मावळ मधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकाला मारहाण केली. तर दुसरीकडे मुख्याध्यापक हे इतर शिक्षकांच्या मदतीने येथील मुलांना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्माचे शिक्षण देत आहेत असा आरोप देखील या शाळेवर करण्यात आला. जोपर्यंत या घटनेबाबत शाळा प्रशासन दोषींवर ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा पवित्रा पालकांनी घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number