जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरांच्या बुलडाण्यातील माटरगावमध्ये शेतकऱ्यांनी बैलाला दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध केला.
या बंदमध्ये सर्वच पक्षीय नेते पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरले असून, हा संप 100 टक्के यशस्वी करून दाखवण्याचा चंग या सर्वांनी बांधलेला पाहायला
मिळतो.
बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी संपाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. आज भाजी मंडई परिसरात आज शुकशुकाट पाहायला मिळाला. तर, दुकानदारांनीही दुकानं बंद
ठेवली आहेत.