जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी क्षेत्रातील नोवाफेना कंपनीत गुरूवारी रात्री मोठा स्फोट झाला होता. रात्री झालेल्या स्फोटामुळे तब्बल 3 कंपन्या जळाल्या आहेत.
मात्र हा स्पोट कशामुळे झाला याच कारण अद्यापही अस्पष्ट आहे. बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत 14 जण जखमी झाले आहेत.
आगीची झळ एमआयडीसीतील इतर तीन केमिकल कारखान्यांना बसल्यानं एकामागोमाग एक असे अनेक स्फोट होत गेले. सुमारे दीड तास स्फोटांचे आवाज सुरू परिसरातून येत होते. या स्फोटांच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भितीचं वातावरण निर्माण झाल होत. रात्री लागलेली आग पहाटे आटोक्यात आणण्यात आलं.
त्यासाठी पालघर, वसई-विरार, ठाणे, इतर ठिकाणांवरून ही अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. या स्फोटांमुळं पालघर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांनाही हादरे बसले. स्फोटामुळे तब्बल 15 किमीचा परिसर हादरला. भूकंप झाल्याची अफवा पसरल्यानं स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट उडाली होती.
