Stray Dogs in Mumbai : मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून मुंबईकरांची सुटका होणार ; जाणून घ्या, BMC च्या शेल्टर होमचा ‘मेगा प्लॅन’

बीएमसीच्या नवीन आराखड्यानुसार, सर्वात आधी जास्त वाहतूक कोंडी असलेले आणि संवेदनशील भाग जसे की, शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके, क्रीडांगणे आणि बस स्थानके येथून कुत्र्यांना पकडले जाईल.

Stray Dogs in Mumbai : मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून मुंबईकरांची सुटका होणार ; जाणून घ्या, BMC च्या शेल्टर होमचा ‘मेगा प्लॅन’

Stray Dogs in Mumbai : मुंबईतील रस्त्यांवर आणि गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने मालवणी येथे पाच एकर जागेवर कुत्र्यांसाठी एक अवाढव्य 'शेल्टर होम' किंवा अभयारण्य उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पाला नगरविकास मंत्रालयाकडून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवरील कुत्र्यांचा वावर कमी होण्यास मदत होणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नवीन धोरण
नोव्हेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोकाट कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणांवरून हटवून शेल्टर होममध्ये ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बीएमसीने आपल्या कार्यपद्धतीत मोठा बदल केला आहे. आतापर्यंत कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडले जात असे. मात्र, नवीन प्रस्तावानुसार, निर्बीजीकरणानंतर या कुत्र्यांना रस्त्यावर न सोडता थेट महापालिकेच्या शेल्टर होममध्ये ठेवले जाणार आहे. 2024 मध्ये सुमारे 62.9 टक्के कुत्र्यांचे निर्बीजीकरण पूर्ण झाले होते. तरीही, रेल्वे स्थानके, बस स्टॉप आणि रुग्णालयांच्या परिसरात कुत्र्यांचा वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा – Mithi River Scam: मुंबई महापालिकेच्या तिजोरीला भगदाड; मुदतठेवींमध्ये 10 हजार कोटींची घट, तर मिठी नदीच्या कामातील मोठा भ्रष्टाचार उघड

मालवणीतील पाच एकर जागेवर 'डॉग्ज सँक्चुअरी'
मुंबईतील पहिले कुत्र्यांचे अभयारण्य मालवणी येथील 5 एकर जागेवर उभारले जाणार आहे. या ठिकाणी कुत्र्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची आणि उपचारांची सोय असेल. नगरविकास खात्याने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. हे शेल्टर होम उभारल्यामुळे कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना कमी होतील आणि शहरातील स्वच्छता राखण्यासही मदत होईल, असा विश्वास पालिकेला वाटत आहे. 

संवेदनशील भागांना मिळणार प्राधान्य
बीएमसीच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत सध्या 90,757 मोकाट कुत्री आहेत. विशेष म्हणजे, 2014 मध्ये ही संख्या 95,000 इतकी होती. गेल्या काही वर्षांत राबवण्यात आलेल्या निर्बीजीकरण मोहिमेमुळे ही संख्या काही प्रमाणात घटली आहे. बीएमसीच्या नवीन आराखड्यानुसार, सर्वात आधी जास्त वाहतूक कोंडी असलेले आणि संवेदनशील भाग टार्गेट केले जातील. यामध्ये शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके, क्रीडांगणे आणि बस स्थानके यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांहून कुत्र्यांना पकडण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पार पाडली जाईल. यामुळे प्राणीप्रेमींच्या तक्रारींनाही वाव उरणार नाही आणि नागरिकांचे संरक्षणही होईल.

हेही वाचा – BMC Water Bill Deadline: मुंबईकरांनो सावधान! पाणी कपात टाळायचीय? मग 'या' तारखेपूर्वी भरा थकीत देयके; पालिकेचा कठोर कारवाईचा इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number