भाजप नेते आशिष शेलार यांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं असतानाच आता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आशिष शेलार यांना बुधवारी कोरोनाची लागण झाली असून तशी माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. “माझी कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. […]

भाजप नेते आशिष शेलार यांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं असतानाच आता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

आशिष शेलार यांना बुधवारी कोरोनाची लागण झाली असून तशी माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. “माझी कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार घेत असून जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे” असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.

याशिवाय शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. आज पुन्हा माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे. याआधी १ मार्चला श्रीकांत शिंदे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. महिन्याभरानंतरच त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number