दारुच्या नशेत पोलीस स्टेशनमध्येच पोलीस कर्मचाऱ्याचा धिंगाणा

वृत्तसंस्था, बिहार   बिहारमध्ये पूर्णपणे दारुबंदी आहे. मात्र, असं असतानाही इथल्या मुजफ्फरपूरमध्ये दारुच्या नशेत एका पोलीस कर्मचाऱ्याने धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला.   रामेश्वर सिंह असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. दारुच्या नशेत धुंद असलेल्या या कर्मचाऱ्याने काजीमोहम्मदपूर पोलीस स्टेशनमध्ये हंगामा केला.   यावेळी मेडिकल तपासणीसाठी त्याला घेऊन जात असताना रामेश्वरने पळ काढला. मात्र, पोलिसांनी […]

दारुच्या नशेत पोलीस स्टेशनमध्येच पोलीस कर्मचाऱ्याचा धिंगाणा

वृत्तसंस्था, बिहार

 

बिहारमध्ये पूर्णपणे दारुबंदी आहे. मात्र, असं असतानाही इथल्या मुजफ्फरपूरमध्ये दारुच्या नशेत एका पोलीस कर्मचाऱ्याने धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला.

 

रामेश्वर सिंह असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. दारुच्या नशेत धुंद असलेल्या या कर्मचाऱ्याने काजीमोहम्मदपूर पोलीस स्टेशनमध्ये हंगामा केला.

 

यावेळी मेडिकल तपासणीसाठी त्याला घेऊन जात असताना रामेश्वरने पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन अखेर त्याला ताब्यात घेतलं.

 

दरम्यान, पोलीस स्टेशनमधले इतर कर्मचारी आणि पदाधिकारीही दारुचा गैरव्यवहार करत असल्याचा खुलासाही या पोलीस कर्मचाऱ्याने केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number