Toll Plaza : सर्वात मोठी बातमी! देशातील टोलनाक्यांवर होणार महत्त्वाचा बदल; नितीन गडकरींची घोषणा

वाहनचालकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टोल प्लाझावर लांबच लांब रांगते उभं राहण्याचा आणि टोल भरण्यासाठी गाडी थांबवण्याचा त्रास आता लवकरच संपणार आहे.

Toll Plaza : सर्वात मोठी बातमी! देशातील टोलनाक्यांवर होणार महत्त्वाचा बदल; नितीन गडकरींची घोषणा

वाहनचालकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टोल प्लाझावर लांबच लांब रांगते उभं राहण्याचा आणि टोल भरण्यासाठी गाडी थांबवण्याचा त्रास आता लवकरच संपणार आहे. सरकार देशभरातील टोल प्लाझा बॅरियर फ्री करण्याच्या दिशेने काम करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच टोल नाक्यावर गाडीचा वेग हा कमी करण्याची जराही गरभ भासणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.

जाणून घ्या सविस्तर
येत्या काही दिवसात फास्टटॅगसोबतच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल बूश हे बॅरियर फ्री करण्याचे सरकारे मुख्य उद्दिष्ट आहे. येत्या डिसेंबर 2026 च्या शेवटपर्यंत तब्बल 70 टक्क्यांहून अधिक टोल बूथ हे बॅरियर फ्री करण्याचं लक्ष असून मार्च 2027 पर्यंत हे काम पूर्ण करण्याची योजना आहे. सध्या पाहिलं तर देशात 13 कोटींहून अधिक फास्टटॅग हे जारी करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय महामार्गांवर साधारण 98 टक्के व्यवहाय फास्टटॅगच्या माध्यमातूनच होत आहेत.

हेही वाचा-Gram Panchayat Election : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचा मुहूर्त ठरला?; तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

नवीन मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टिममध्ये वाहनांना टोल प्लाझावर येत्या काही दिवसांत थांबण्याचीही गरज राहणार नाही. वाहन हे टोल झोनमधून पुढे जाताच हायटेक कॅमेऱ्यांच्या मदतीने नंबर प्लेट स्कॅन ही करण्यात येईल आणि त्यानंतर लिकं केलेल्या संबंधिक खात्यामधून टोलची रक्कम वसूलली जाईल. विशेष म्हणजे, या प्रणालीची 11 मे 2026 रोजी मुंबईतील एका टोल प्लाझावर चाचणीही करण्यात आली आहे.

गडकरी यांच्या माहितीनुसार, आधी टोल प्लाझावर एका वाहनाला साधारण 12 मिनिटं थांबावं लागत होतं. नव्या प्रणालीमुळे हा वेळ आता जवळपास शून्यावर येऊ शकतो.यामुळे वाहनचालकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number