एसटीने प्रवास करणाऱ्या असंख्य महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सवलतीत प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड बंधनकारक केल्यानंतर बऱ्याच प्रवाशांची बायोमेट्रिकमध्ये अडचण येत होती. ज्यात नागरिकांना ठसे जुळत नसल्याने कार्डच मिळत नव्हते. शेवटी या सर्व गोंधळावर एसटी महामंडळाने तोडगा काढला असून नियमांमध्ये मोठी शिथिलता दिलेली आहे.
हिला आणि ज्येष्ठांना मोठा फायदा
महामंडळाने गेल्या 1 तारखेपासून महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक तसेच 75 वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर एनसीएमसी हे कार्ड अनिवार्य केले होते. याच कार्डमधून बस प्रवास करताना तिकीट काढण्याची अट घातली होती. मात्र, प्रत्यक्षात पाहिले तर हे कार्ड काढत असताना प्रवाशांना मनस्पाप सहन करावा लागला.
कार्डची प्रक्रिया होणार सोपी
अनेक ज्येष्ठ व्यक्तींच्या बोटांचे ठसे येत नसल्याने नोंदणीच होत नव्हती. याच तक्रारींची दखल घेत महामंडळाने आता आधार ओटीपीचा पर्याय सुरु केला आहे. 21 सप्टेंबरपासून बायोमेट्रिक जुळत नसल्यास आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपीवरुनही एनसीएमसी कार्डची नोंदणी पूर्ण करता येईल. यामुळे विशेषतहा अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, 19 सप्टेंबरपर्यंत ज्या प्रवाशांनी एनसीएमसीसाठी नोंदणी केली नाही, अशा सर्वांना 25 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कार्ड वाटप हे सुरु होणार आहे. एवढेच नव्हे तर अजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
दुसरीकडे 21 सप्टेंबरपासून ज्यांचे NCMC हे कार्ड हरवले किंवा चोरीला गेले आहे, त्यांना ते कार्ड ब्लॉक करुन अवघे 199 रुपये शुल्क भरुन नव्याने कार्ड नागरिकांना घेता येणार आहे. नोंदणी केलेल्या प्रवाशांना सध्या क्युआर कोड असलेली पावती देखील दिली जात आहे. जर कार्ड मिळण्यास उशीर झाला तर 30 दिवसांपर्यंत असलेल्या या पावतीवर सवलतीत तिकीट मिळणार आहे.महत्त्वाची गोष्ट म्हणजे,30 दिवसांच्या आतमध्ये कार्ड अॅक्टिव्ह करुन टॉप-अप करणे बंधनकारक असणार आहे. तरच पुढे सवलत सुरु राहील.