Gold-Silver Rate : सर्वसामान्यांसाठी मोठी खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा राज्यात नेमका दर किती?

जर यंदाच्या सणाला तुम्हीही सोने किंवा चांदीची वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असताल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे.

Gold-Silver Rate : सर्वसामान्यांसाठी मोठी खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा राज्यात नेमका दर किती?

गौरी-गणपतीच्या सणाला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असतानाच सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सणा-सुदीला असंख्य ग्राहक सोने किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोने-चांदीच्या किमतींमुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. 

जाणून घ्या दर
 जर यंदाच्या सणाला तुम्हीही सोने किंवा चांदीची वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असताल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण आज सोन्याच्या किंमतीती मोठी घसरण झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भावा 199 रुपयांनी घसरुन 1.53 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम झालेला आहे, तर एक किलो चांदीचा भाव हा 1607 रुपयांनी कमी होऊन 2.34 लाख रुपयांवर पोहोचला आहे.

हेही वाचा -https://www.jaimaharashtranews.com/maharashtra-marathi-news/the-meteorological-department-has-issued-a-yellow-alert-for-11-districts-in-maharashtra-including-mumbai-raigad-and-pune-with-thunderstorms/59698

भाव पुन्हा वाढणार का?
सर्वसामान्य असलेल्या गुंतवणूकदारांसोबत रिझर्व्ह बँक सारख्या असलेल्या जागतिक मध्यवर्ती बँकांकडूनही सोन्याची वारंवार खरेदी केली जात आहे. त्यामुळेच सोने मजबूत स्थिती आहे. जर भविष्यातील बाजारातील वस्तुस्थिती पाहता, येत्या डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव हा तब्बल 1.70 लाख रुपयांपर्यत, तर दुसरीकडे चांदीचा भाव हा 3 लाख रुपयांपर्यंत जाण्याची मोठी शक्यता ही, बाजारातील तज्ज्ञांच्या मते वर्तवण्यात आलेली आहे.

चांदीचा भाव काय?
शुक्रवार 11 सप्टेंबर अर्थात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव हा प्रति 10 ग्रॅम 1,53,287 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर आज चांदीचा दर सकाळी 2,33,642 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. महत्त्वाचे म्हणजे देशातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या अंतिम दरात थोडा फरक हा दिसून येतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number