Cabinet Decisions: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय; ‘रेअर अर्थ मॅग्नेट’ निर्मितीसह पुणे मेट्रो विस्तारालाही हिरवा कंदील

कॅबिनेट बैठकीतच पुण्यातील नागरिकांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज 2 ला अधिकृत मान्यता देण्यात आली.<br/>

Cabinet Decisions: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय; ‘रेअर अर्थ मॅग्नेट’ निर्मितीसह पुणे मेट्रो विस्तारालाही हिरवा कंदील

Cabinet Decisions: केंद्र सरकारने देशातील अत्यावश्यक तांत्रिक उद्योगांना बळ देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुर्मिळ पृथ्वीच्या कायमस्वरूपी चुंबकांच्या (Rare Earth Permanent Magnets) निर्मितीसाठी 7,280 कोटींच्या प्रोत्साहन योजनाला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या योजनेचा उद्देश देशात महत्त्वपूर्ण दुर्मिळ पृथ्वी चुंबकांची उत्पादनक्षमता वाढवणे आहे. आमचे लक्ष्य वार्षिक किमान 6,000 MTPA क्षमता निर्माण करणे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दुर्मिळ पृथ्वी चुंबकांचा वापर कुठे?

हे चुंबक इलेक्ट्रिक वाहने, एरोस्पेस, वैद्यकीय उपकरणे, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांचे कणा मानले जातात. योजनेअंतर्गत जागतिक निविदा प्रक्रियेद्वारे पाच कंपन्यांची निवड होईल आणि प्रत्येकाला जास्तीत जास्त 1,200 MTPA उत्पादन क्षमता दिली जाईल.

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी

कॅबिनेट बैठकीतच पुण्यातील नागरिकांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज 2 ला अधिकृत मान्यता देण्यात आली.

मंजूर मार्ग:
लाइन 4 : खराडी – हडपसर – स्वारगेट – खडकवासला
लाइन 4A : नाल स्टॉप – वारजे – माणिक बाग
एकूण 31.6 किमी लांबीच्या या दोन लाईन्सवर 28 एलिव्हेटेड स्टेशन असतील. या प्रकल्पासाठी एकूण खर्च 9,857.85 कोटी असून हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी लागणार आहे.  या प्रकल्पासाठी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि बाह्य आर्थिक संस्थांकडून संयुक्त निधी उभारला जाणार आहे. महा-मेट्रो संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी करेल.

हेही वाचा – VIT Bhopal : व्हीआयटी भोपाळमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन हिंसक वळणावर! कुलगुरूंच्या बंगल्याची केली तोडफोड; नेमकं प्रकरण काय?

वाहतुकीला मोठा बूस्ट

खराडी आयटी पार्क, हडपसर MIDC, स्वारगेट, सिंहगड रोड, कर्वे रोड व पुणे–बेंगळुरू महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता या लाईन्स मोठा दिलासा देणार आहेत. इतर कॉरिडॉरशीही या लाईन्स अखंडपणे जोडल्या जातील. तथापी, हडपसर रेल्वे स्टेशन इंटरचेंज पॉईंट म्हणून विकसित केले जाईल.

प्रवाशांची संख्या तिपटीने वाढणार

2028 मध्ये 4.09 लाख दैनंदिन प्रवाशांवरून 2058 पर्यंत 11.7 लाखांहून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मंजुरीनंतर पुणे मेट्रो नेटवर्क 100 किमीपेक्षा जास्त होणार आहे.

हेही वाचा – Share Market Updates: आर्थिक बाजारात सकारात्मक सुरुवात; रुपया 89.20 पातळीवर स्थिर

रेल्वे प्रकल्पांबाबतही मोठा निर्णय

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की बदलापूर–कर्जत दरम्यानच्या नवीन तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या मंजुरीमुळे मुंबई–पुणे रेल्वे वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. दिवा–बदलापूर चार-मार्ग प्रकल्पाचे काम बर्‍याचअंशी पूर्ण झाले असून, या विस्तारामुळे मुंबई–पुणे–हैदराबाद–बेंगळुरू–चेन्नई हा महत्त्वाचा दळणवळण कॉरिडॉर आणखी मजबूत होईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number