Social Media Ban: मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि विकासावर होणारे विपरित परिणाम रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत मोठी घोषणा केली. या नवीन निर्णयानुसार, कर्नाटक राज्यातील 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे मुलांवर होणारे नकारात्मक परिणाम लक्षात घेऊन हा कठोर निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
देशातील पहिले राज्य; आंतरराष्ट्रीय मॉडेल्सचा अभ्यास
सोशल मीडियावर अशा प्रकारची बंदी घालणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या निर्णयापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ऑस्ट्रेलियासारख्या देशांमधील सोशल मीडिया निर्बंधांच्या उदाहरणांवर चर्चा केली होती. सरकारने या बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मॉडेल्सचा सखोल अभ्यास केला आहे. कर्नाटकच्या या निर्णयाचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटताना दिसत असून गोवा, महाराष्ट्र आणि बिहारमध्येही अशा प्रकारच्या निर्बंधांबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.
हेही वाचा – PNB ग्राहकांना झटका! 1 एप्रिलपासून ATM बाबतच्या नियमात ‘हा’ बदल; हे आहे कारण
Bengaluru: Karnataka CM Siddaramaiah presents the State Budget at the Vidhana Soudha. He says, "AI and Tech park under IISC will set up a robotics and AI campus called Bangalore Robotics and AI innovation zone in collaboration with ISRO and Keonics. Social media will be banned… pic.twitter.com/L8PeBDxySq — ANI (@ANI) March 6, 2026
रोबोटिक्स आणि एआय कॅम्पसची घोषणा
एकीकडे सोशल मीडियाच्या दुष्परिणामांपासून मुलांना वाचवण्याचा प्रयत्न होत असताना, दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या विधायक वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी बंगळुरूमध्ये ‘रोबोटिक्स आणि एआय इनोव्हेशन झोन’ स्थापन करण्याची घोषणा केली. आयआयएससी (IISc) अंतर्गत आणि इस्रो (ISRO) व केओनिक्सच्या (KEONICS) सहकार्याने हा अत्याधुनिक कॅम्पस उभारला जाणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न होता तो मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्हावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे.