Beed Crime : विवाहितेला घरातून उचलून नेलं तर दुसरीकडे अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून…; अत्याचाराच्या दोन घटनांनी बीड हादरलं

बीडमधून दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. बीड अत्याचाराच्या दोन घटनांनी हादरलं आहे. परळीमध्ये अल्पवयीन मुलगी तर बीड तालुक्यातील एका गावामध्ये विवाहितेवर अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे.

Beed Crime : विवाहितेला घरातून उचलून नेलं तर दुसरीकडे अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून…; अत्याचाराच्या दोन घटनांनी बीड हादरलं

बीडमधून दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. बीड अत्याचाराच्या दोन घटनांनी हादरलं आहे. परळीमध्ये अल्पवयीन मुलगी तर बीड तालुक्यातील एका गावामध्ये विवाहितेवर अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे. बीडच्या परळी तालुक्यातील एका गावामध्ये एका सोळा वर्षीय मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यामध्ये आरोपीने या मुलीला घरी बोलावून दुसऱ्या साथीदाराने तिचे हातपाय बांधत अत्याचार केले होते. या मुलीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर कुटुंबीयांनी याचा जाब आरोपींना विचारताच आरोपींनी त्यांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा- Crime News: भयंकर! मोबाईल पासवर्ड न सांगितल्याने धाकट्या भावाने मोठ्या भावाला संपवलं, आरोपीला अटक
तर दुसरीकडे बीड तालुक्यातील एका गावामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. यानंतर तिला गावामध्ये आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवले गेले. हा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी या विवाहितेची सुटका केली या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील आरोपी वैभव पटेकर याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात अधिक तपास पोलीस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number