Beed Crime: छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहले आहे.

Beed Crime: छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

बीड : छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहले आहे. या पत्रातून झालेला संपूर्ण प्रकार त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितला आहे.

छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने धाराशिवमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महिनाभरापूर्वी ही घटना घडली होती. आत्महत्या झालेल्या मुलीचे आजच्या दिवशी लग्न होणार होते. आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहले आहे. 

हेही वाचा : हिंदी नव्हे मराठीच अनिवार्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

उपमुख्यमंत्र्यांकडे भाचीला न्याय मिळवून देण्याची मागणी
छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडमध्ये  शिक्षण घेणाऱ्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साक्षी कांबळे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.  आजच्या दिवशी म्हणजे 20 एप्रिल रोजी या मुलीचं लग्न ठरलं होतं. सदर तरुणीने ब्लॅकमेलिंगला कंटाळून धाराशिव येथील मामाच्या घरी गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. घटनेला एक महिना पूर्ण होत आला तरी देखील न्याय मिळत नाही. त्यामुळे साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. धाराशिव पोलिसांनी कसलेही सहकार्य केले नाही असा आरोप साक्षीची आई कोयना विटेकर यांनी केली आहे. माझ्या मुलीसोबत जे घडलं ते इतर मुलींसोबत घडू नये यासाठी या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील पीडित कुटुंबाने केली आहे. धाराशिव पोलिसांनी आरोपी अभिषेक कदम याला अटक केली असून त्याची जामीनावर सुटका देखील झाली आहे. दरम्यान या प्रकरणात लक्ष घालून आरोपीला कठोर शिक्षा देऊन भाचीला न्याय मिळवून द्या अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number