जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
पावणे एमआयडीसीतल्या बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने तुर्तास स्थगिती दिलीय. 8 जानेवारीपर्यत बावखळेश्वर मंदिर आणि परिसरातील बांधकामावर कारवाई होणार नसल्याने शिवभक्तांना दिलासा मिळालाय.
बावखळेश्वर ट्रस्टने एमआयडीसीतील 35 एकर जागेवर तीन मंदिरे आणि सभोवताली सुशोभीकरण केलय. यासाठी काही कोटी रूपयेही खर्च करण्यात आलेत.
सिडको, एमआयडीसी आणि महापालिकेने नवी मुंबईकरांसाठी कोणताही परिसर पर्यटनासाठी विकसित केला नाही त्यामुळे जागा ताब्यात घेवून नवी मुंबईकरांसाठी हे पर्यटनस्थळ जाहिर करण्याची मागणी होतेय.