अवघ्या काही दिवसांवर गौरी-गणपतीचा सण आलेला आहे. सणांच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात खर्च वाढतो आणि नागरिकांची धाव ही बँकेच्या दिशेने जाते. मात्र, या दिवसात तुमची बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असतील तर, ही बातमी प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजपासून सरकारी बँकांचा संप सुरु झालेला आहे. यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने ही संपाची हाक दिलेली आहे. हा संप खरं तर पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी केला आहे. गेल्या काही वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांची ही मागणी आहे. पण अजूनही त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे बँक कर्मचारी संपावर असणार असून नेमकं गणेशोत्सवाच्या तोंडावर बँका किती दिवस बंद राहणार हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे?.
बँक संपामुळे ग्राहकांची गैरसोय
हा संप देशव्यापी असून याचा सर्वाधिक परिणाम हा सरकारी बँकांच्या कामकाजावर होणार आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टटे बँक ऑफ इंडियापासून ते पंजाब नॅशनल बँकेपर्यंतच्या सर्व सरकारी बँका बंद आहेत. शिवाय बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन यूको बँकेसहीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांमध्येही आजपासून कामकाज बंद राहणार आहे. संपामुळे ग्राहकांना बँकेत कोणतीही सुविधा मिळत नसल्याने घरी तसचं परतावे लागत आहे.
बँक संपात नागरिकांना मोठा दिलासा
दुसरीकडे काही ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. देशातील सर्वच खाजगी बँका या संपापासून दूर आहेत. या सर्व बँकेत तुम्ही जाऊन तुमचे व्यवहार करु शकता. तर बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम हा डीजिल बँकिंग सेवांवर कोणताही झालेला नाही. नागरिक यूपीआय सेवा, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगने घर बसल्या व्यवहार करु शकत आहेत.
किती दिवस बँका बंद?
नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे हा बँकेचा हा संप तीन दिवस राहणार आहे. याचा अर्थ की हा सोमवारपासून नागरिकांना बँकेत जाणून त्याची काम करता येतील. राष्ट्रीयकृत बँकांच्या संपाचे पडसाद सध्या महराष्ट्रातील काही ठिकाणी उमटताना दिसत आहेत.