India Foreign Politics : भारताचा पुन्हा एकदा विश्वासघात! या शेजाऱ्याचा पाकिस्तानसोबत महत्त्वाचा करार

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे JF-17 थंडर फायटर जेट्स खरेदी करण्याबाबत सुरू असलेली चर्चा. हे लढाऊ विमान पाकिस्तान आणि चीन यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.

India Foreign Politics : भारताचा पुन्हा एकदा विश्वासघात! या शेजाऱ्याचा पाकिस्तानसोबत महत्त्वाचा करार

India Foreign Politics : इराण आणि अमेरिका संघर्षाच्या काळात भारताने बांगलादेशला LPG गॅसचा पुरवठा करून मोठी मदत केली होती. मात्र, अवघ्या काही दिवसांतच या मदतीचा विसर पडलेला दिसत आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात आता संरक्षणात्मक पातळीवर मोठे करार होत आहेत. ही बाब भारतासाठी विश्वासघातासारखी मानली जात आहे, कारण पाकिस्तान आणि बांगलादेशमधील ही वाढती जवळीक दक्षिण आशियातील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे.

हवाई दलाचा प्रशिक्षणाबाबत मोठा करार
भारताने संकटकाळात ज्या देशाला सढळ हस्ते मदत केली, तोच बांगलादेश आता भारताच्या शत्रू राष्ट्राशी म्हणजेच पाकिस्तानशी हातमिळवणी करताना दिसत आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाचे 7 सदस्यांचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ नुकतेच बांगलादेशची राजधानी ढाका येथे दाखल झाले आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, दोन्ही देशांमध्ये प्रथमच 'एअर स्टाफ टॉक्स' आयोजित केले जाणार आहेत. या बैठकीचा मुख्य उद्देश हवाई सहाय्यता, प्रशिक्षण सराव आणि दोन्ही देशांच्या हवाई दलातील संबंध दृढ करणे हा आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देशांमध्ये हवाई दल पायलट प्रशिक्षण करारावरही स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशमधील ही लष्करी मैत्री भारताच्या सीमावर्ती भागांमधील शांततेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरू शकते.

JF-17 थंडर फायटर जेट्सवर डोळा
या संरक्षण करारातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे JF-17 थंडर फायटर जेट्स खरेदी करण्याबाबत सुरू असलेली चर्चा. हे लढाऊ विमान पाकिस्तान आणि चीन यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. बांगलादेशचे एअर चीफ मार्शल हसन महमूद खान यांनी ही विमाने खरेदी करण्याची इच्छा नुकतीच व्यक्त केली होती. ज्या पाकिस्तानविरुद्ध 1971 मध्ये भारताने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याच पाकिस्तानसोबत आणि त्यांच्या चिनी बनावटीच्या विमानांसाठी बांगलादेश आता उत्सुक दिसत आहे. हा विमान करार पूर्ण झाल्यास बांगलादेशाच्या संरक्षण दलात पाकिस्तानचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – India-Nepal Relations: नेपाळमध्ये 'बालेन पर्व' सुरू होताच भारत-नेपाळ मैत्रीत मिठाचा खडा; 45 दिवसांत भारताविरोधी घेतले 'हे' मोठे निर्णय

भारतीय दूतावासावरील हल्ला आणि तणाव
भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध गेल्या काही काळापासून चढ-उताराचे राहिले आहेत. मधल्या काळात दोन्ही देशांत तणाव होता, जो निवडणुकांनंतर निवळल्याचे वाटत होते. मात्र, याच दरम्यान बांगलादेशातील भारतीय दूतावासावर झालेला हल्ला ही एक गंभीर घटना मानली जात आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश आता पाकिस्तानच्या गोटात सामील होत असल्याचे चित्र दिसत आहे. पाकिस्तान नेहमीच आपल्या स्वार्थासाठी आणि भारताविरोधात कट रचण्यासाठी अशा संधींचा शोध घेत असतो, ज्याची प्रचिती आता बांगलादेशच्या माध्यमातून येत आहे.

भारताची सतर्कता आणि सावध पवित्रा
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर आणि बैठकीवर भारत सरकार आणि गुप्तचर यंत्रणांचे बारीक लक्ष आहे. कोणत्याही क्षणी परिस्थिती बदलू शकते, याची जाणीव असल्याने भारतीय संरक्षण दले सतर्क आहेत. भारताने मैत्रीचा हात पुढे करूनही बांगलादेश ज्या पद्धतीने पाकिस्तानशी लष्करी संबंध वाढवत आहे, ते पाहता आता बांगलादेशवर विश्वास ठेवणे भारतासाठी कठीण झाले आहे. या बदलत्या समीकरणांमुळे आगामी काळात भारताला आपल्या शेजारील देशांबाबतच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल करावे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – California Mayor Eileen Wang : महापौर अमेरिकेतील शहराची, मात्र चीन समर्थनार्थ प्रचार; FBI च्या आरोपानंतर आयलीन वांग यांचा राजीनामा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number